Tue, Apr 23, 2019 00:02होमपेज › Konkan › मालवण तालुक्यात होळीच्या उत्साहाचे उधाण!

मालवण तालुक्यात होळीच्या उत्साहाचे उधाण!

Published On: Mar 03 2018 1:48AM | Last Updated: Mar 02 2018 11:22PMमालवण : वार्ताहर 

कोकणचा सांस्कृतिक एकोपा जोपासणारा होळीसण मालवण तालुक्यात रुढी परंपरा जोपासत आनंदोत्सवात साजरा झाला. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गसह तालुक्यात ठिकठिकाणी होळी उत्सवाची धूम पहावयास मिळाली. धुलीवंदन-रंगपंचमी निमित्त ठिकठिकाणी युवा तरुणाईचे गट रंगपंचमीचा खेळ खेळताना दिसून आले. 

मालवण तालुक्यात सार्वजनिक व खाजगी असे सुमारे 140 ते 150 हून अधिक  होळ्या रात्रौ  उभारून तालुक्यात होळी उत्सव साजरा करण्यात आला.होळी-धुळीवंदना निमित्त युवा तरुणाई मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. शहरातील  देऊळवाडा येथील श्री नारायण मंदिर परिसरात धुळवड उत्सव -रंगपंचमी साजरी  करण्यात आली. यावेळी शर्तीचे व शक्तिप्रदर्शनाचे खेळही खेळण्यात आले. तर रंगाची उधळण करीत युवावर्ग बेधुंद झाले होते.लहान बच्चे कंपनी देखील रंगोत्सवात बेधुंद होऊन ढोल ताशा,डी.जे. च्या तालावर नाचत होती. धुळीवंदन उत्सवाची मज्जा घेताना तरुणाई दिसत होती. मालवण शहरात  धुलीवंदन सोहळा सायंकाळ पर्यंत शांततेत सुरु होता.

ऐतिहासिक किल्ले 
सिंधुदुर्गावरही होळीसण

मालवण ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवरही ऐतहासिक परंपरा जोपासत होळी उत्सव साजरा करण्यात आला.किल्ले रहिवाशांच्या वतीने गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शिवकालीन प्रथेनुसार शिवराजेश्‍वर मंदिरातील राजदंड घेवून मालवण तालुक्यातील न्हिवे या गावातून होळी पायी चालत आणली. रात्री 8  वाजण्याच्या सुमारास किल्ले सिंधुदुर्ग वर ही  होळी नेत रात्री समस्त किल्ले रहिवाशांनी  जमून होळी उत्सव साजरा केला.