Sun, Apr 21, 2019 00:02होमपेज › Konkan › रत्नागिरी : किनार्‍यावरील शेकडो गावांना उधाणाचा धोका

रत्नागिरी : किनार्‍यावरील शेकडो गावांना उधाणाचा धोका

Published On: Jun 02 2018 11:13PM | Last Updated: Jun 02 2018 10:38PMरत्नागिरी : वार्ताहर

यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत 18 दिवस धोक्याचे आहेत. या दिवशी समुद्राला मोठे उधाण येणार असल्याने आणि चार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र आणि खाडी किनार्‍यावरील शेकडो गावांना उधाणाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

या उधाणांच्या दिवशी मुसळधार पाऊस पडल्यास बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यातील उधाणाचे दिवस हे किनारपट्टीवरील गावांसाठी परीक्षा घेणारे ठरतात. या दिवसांत मुसळधार पाऊस पडल्यास पूरस्थिती निर्माण होते. जिल्ह्यात अनेकदा असे प्रसंग निर्माण झाले आहेत.

 26 जुलै 2005 हा दिवस यामुळेच अनेकांच्या स्मरणात राहिला. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणादेखील समुद्राला येणार्‍या भरती-ओहोटीचा अभ्यास करून उधाणाने संभावीत हानी टाळण्यासाठी प्रयत्न करते. यावर्षी पावसाळ्यात समुद्राला 18 दिवस मोठे उधाण येणार आहे. या उधाणाच्या कालावधीत चार मीटरपेक्षा मोठ्या लाटा उसळणार आहेत. 15 जुलैला 4.97 मीटर उंचीची सर्वात मोठी लाट उसळणार आहे. या उधाणाचा 

समुद्रकिनारी व खाडीकिनारी असलेल्या गावांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे उधाणाच्या कालावधीत या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजनांची तयारी आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरू केली आहे. 

भारतीय हवामान विभागाने यंदा पावसाचे आगमन वेळेत होणार, असा अंदाज वर्तवला असून यंदा पावसाची जोरदार बॅटिंग होणार आहे. त्यात समुद्रातही 5 मीटरपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. केरळात पावसाने हजेरी लावली असून मुंबईसह महाराष्ट्रात कधीही बरसण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जात 
आहे.

जून 2018

दिवस     दिनांक     वेळ     उंची
बुधवार     13 जून     11.43     4.68
गुरुवार     14 जून     12.30     4.85
शुक्रवार     15 जून     1.18     4.92
शनिवार     16 जून     2.06     4.91
रविवार     17 जून     2.56     4.82
सोमवार     18 जून     3.47     4.65

जुलै 2018

दिवस     दिनांक     वेळ     उंची
गुरुवार     12 जुलै     11.27     4.65
शुक्रवार     13 जुलै     12.13     4.85
शनिवार     14 जुलै     1.02     4.96
रविवार     15 जुलै     1.49     4.97
सोमवार     16 जुलै     2.37     4.89
मंगळवार     17 जुलै     3.25     4.70

ऑगस्ट 2018

दिवस     दिनांक     वेळ     उंची
शुक्रवार     10ऑगस्ट     11.11     4.60
शनिवार     11ऑगस्ट     11.56     4.82
रविवार     12ऑगस्ट     12.41     4.95
सोमवार     13ऑगस्ट     1.26     4.96
मंगळवार     14ऑगस्ट     2.08     4.85
बुधवार     15ऑगस्ट     2.52     4.62