Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Konkan › हिर्लोक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात

हिर्लोक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात

Published On: Nov 30 2017 11:31PM | Last Updated: Nov 30 2017 10:02PM

बुकमार्क करा

हिर्लोक : वार्ताहर

हिर्लोक गावचे ग्रामदैवत श्री देव लिंगेश्‍वराचा वार्षिक जत्रोत्सव भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात साजरा झाला. मंदिरावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली होती.
 जत्रोत्सवानिमित्त गावात सकाळपासूनच भाविक व भक्तांची गर्दी दिसून येत होती. श्रींच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.  

सकाळी देवदेवतांची  सवाद्य पूजाअर्चा झाल्यानंतर  नवस बोलणे, फेडणे, केळी ठेवणे, ओटी भरणे असे धार्मिक कार्यक्रम  झाले. ग्रामस्थांबरोबरच चाकरमानी, माहेरवासिनींनी उपस्थिती दर्शवल्याने  मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला.  रात्री देव-देवतांची सवाद्य पालखी मिरवणूक असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडली.  त्यानंतर खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाट्यप्रयोग  झाला.