Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Konkan › आगामी तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार

आगामी तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार

Published On: Aug 17 2018 10:34PM | Last Updated: Aug 17 2018 10:22PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात आगामी तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.  या कालवधीत दक्षिण कोकणसह गोव्यात 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने देताना प्रशासनांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

ऑगस्ट महिन्यात श्रावणापासून पावसाने जिल्ह्यात सातत्य ठेवले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2800 मि. मी. सरासरी पाऊस झाला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात  16.44  मि. मी. च्या सरासरीने 148  मि. मी. पाऊस झाला. यामध्ये मंडणगड 22, दापोली 17, खेड 28, गुहागर 6, चिपळूण 18, संगमेश्‍वर 17, रत्नागिरी 5, लांजा 15, आणि राजापूर 20  मि. मी. पाऊस झाला. नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार संगमेश्‍वर आणि रत्नागिरी तालुक्यांत मुसळधार पावसाने झालेल्या पडझडीत 1 लाखांची हानी झाली. यामध्ये संगमेश्‍वर तालुक्यात किरबेट येथे दोन घरांचे आणि स्मशानभूमीची सुमारे 95 हजारांची हानी झाली. रत्नागिरी तालुक्यात गुरूमळी येथे घरावर झाड पडल्याने 7 हजारांचे नुकसान झाले.