Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Konkan › 48 तासांत कोकणात मुसळधार

48 तासांत कोकणात मुसळधार

Published On: Jun 19 2018 10:47PM | Last Updated: Jun 19 2018 10:08PMपुणे : प्रतिनिधी 
नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) गेल्या आठवडाभरापासून एकाच जागी स्थिर असून, अनुकूल वातावरणाअभावी त्याची पुढील वाटचाल रखडली आहे. मात्र, शुक्रवार (दि. 22) ते सोमवारदरम्यान (दि. 25) मान्सूनसाठी लागणारे पोषक वातावरण तयार होण्याचा अंदाज असून, मान्सून वेगाने उर्वरित महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये डेरेदाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे येत्या 48 तासांत कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीदरम्यान समांतर कमी दाबाचे क्षेत्र असून, मध्य महाराष्ट्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच स्थितीमुळे कोकण, गोवा, मुंबईत जोरदार पाऊस पडणार आहे.