Sat, Jul 20, 2019 14:59होमपेज › Konkan › जिल्ह्यात पावसाची ९० टक्के मजल

जिल्ह्यात पावसाची ९० टक्के मजल

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 10:25PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

सरासरी साडेतीन हजार मि. मी. पाऊस पडणार्‍या कोकणात पावसाची वाटचाल अन्य विभागांच्या तुलनेत 100 टक्के सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने 90 टक्के मजल मारली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने तीन हजार मि. मी. चा टप्पा गाठला आहे. सरासरी पर्जन्यमान पूर्ण करण्यासाठी केवळ पावसाला 500 मि. मी.चा रिक्‍त अनुशेष भरून काढायचा आहे. दरम्यान, जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आगामी तीन दिवस वर्तविण्यात आली आहे. 

श्रावण महिना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात पावसाने सातत्य राखले आहे. अनेक भागात संततधार कायम असल्याने खरिपाला पोषक पाऊस जिल्ह्यात सुरू आहे. सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात राजापूर तालुक्यात झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात नोंदविला आहे. गतवर्षी  याच कालावधीत अडीच हजार मि.मी. सरासरी पाऊस झाला होता. यावर्षी ऑगस्ट महिन्यातच पावसाने तीन हजारांची मजल गाठली आहे. शासकीय निकषानुसार जिल्ह्यात दरवर्षी 3346 मि.मी. पाऊस पडतो. या तुलनेत पावसाने आघाडी घेतली आहे.