Sun, Nov 18, 2018 07:04होमपेज › Konkan › आरोग्य सेविकेला पतीची मारहाण

आरोग्य सेविकेला पतीची मारहाण

Published On: Feb 10 2018 11:31PM | Last Updated: Feb 10 2018 11:23PMदेवरुख : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील तुळसणी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असणार्‍या सेविकेला तिच्या पतीने मारहाण केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजया विजय यादव या तुळसणी येथे आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती विजय यादव हा मद्य प्राशन करून चारित्र्याच्या संशयावरून सतत त्रास देत असल्यामुळे त्याच्यापासून विभक्त राहतात. गुरूवारी त्या नेहमीप्रमाणे आरोग्य उपकेंद्रात काम करीत असताना दुपारी 2.15 च्या सुमारास विजय हा उपकेंद्रात आला व त्याने त्यांच्याशी बँकेच्या एटीएमची मागणी केली. त्यावेळी त्यांनी नकार दिला. याचा राग आल्याने विजय याने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आपल्याला पतीने मारहाण केल्याची तक्रार त्यांनी शनिवारी देवरूख पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार देवरूख पोलिसांनी विजय विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण उदेग करीत आहेत.