Wed, Jul 17, 2019 08:40होमपेज › Konkan › गुहागर, देवरूख न.पं.निवडणूक आज मतदान

गुहागर, देवरूख न.पं.निवडणूक आज मतदान

Published On: Apr 10 2018 10:33PM | Last Updated: Apr 10 2018 9:30PMगुहागर/देवरूख : प्रतिनिधी

जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा गुहागर व देवरूख या दोन न.पं. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, बुधवारी (दि. 11) मतदान होत आहे. गुहागरमध्ये 17 प्रभागांमध्ये 17 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, 5837 मतदार तर देवरूखमध्ये 17 प्रभागांत 17 मतदान केंद्रांवर 9864 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 2764 पुरुष असून, महिला मतदारांची संख्या 3073 आहे. या निवडणुकीत चौरंगी लढत होणार आहे. महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त असल्याने महिलांची मते यावेळी निर्णायक ठरणार आहेत. महिलांसाठी नऊ प्रभाग आरक्षित असून या नऊ जागांसाठी 25 उमेदवार रिंगणात आहेत. अन्य दोन सर्वसाधारण मतदारसंघांत दोन महिला रिंगणात आहेत. उर्वरित पुरुष उमेदवार आहेत. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे दीपक कनगुटकर, शहर विकास आघाडीकडून प्रदीप बेंडल तर भाजपचे बागकर रिंगणात असून तिरंगी लढत होणार आहे.  

या मतदानासाठी नगरपंचायत प्रशासनाने महसूल यंत्रणा व शिक्षक यांना प्रशिक्षण दिले असून, एकूण 17 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त ठेवण्यासाठी गुहागर पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बळ मागविले आहे.  या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्यात चुरशीचा सामना आहे. देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी 9 हजार 864 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. देवरूख निवडणूक विभाग व देवरूख पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. देवरूखात तब्बल 80 पोलिस नाक्यानाक्यांवर तैनात करण्यात आले आहेत. एकूण 17 केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. यामध्ये 2 पोलिस निरीक्षक, 5 पोलिस उपनिरीक्षक, 15 आरसीपीचे जवान, 10 होमगार्ड याबरोबरच अतिरिक्त पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत. 
• भरारी पथकाचा ‘