होमपेज › Konkan › गुहागरमधील ४० वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

गुहागरमधील ४० वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 03 2017 11:18PM

बुकमार्क करा

गुहागर  प्रतिनिधी

दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने  सुट्टी असल्याने समुद्रावर फेरफटका मारण्यासाठी आणि पाण्यात उतरलेल्या 40 वर्षीय तरूण समुद्रकिनारी आलेल्या वादळी लाटेच्या तडाख्यात सापडून बुडून मयत झाल्याची दु:खद घटना गुहागरमधील दुर्गादेवी वाडीवर रविवारी घडली.

समुद्रात बुडून मयत पावलेल्या तरूणाचे नाव नंदेश गोपाळ सांगळे असे असून तो रिक्षा वडापचा व्यवसाय करीत होता. आज दत्तजयंती उत्सव असल्याने सुट्टी घेऊन गुहागरच्या समुद्रावर फेरफटका मारण्यासाठी दुपारी 2.30 वाजता गेला होता. दोन दिवसापासून अरबी समुद्रात ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसणार असा इशारा हवामान खात्याकडून दिला गेला होता. यातच काल पौर्णिमा झाल्याने व समुद्रात वादळी हवामान असल्याने समुद्रात उतरलेल्या या तरूणाला जोरदार लाटांनी आपल्या विळख्यात घेतले. त्यामुळे हा तरूण समुद्रात बुडाला असावा. त्याचा मृतदेह काही तासातच म्हणजे सायंकाळी 5.30 च्या सुमारास गुहागरच्या समुद्रकिनारी लागले. हा मृतदेह लागल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर या घटनेचा रितसर पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले. बुडून मृत झालेल्या तरूणाच्या पश्‍चात पत्नी व लहान मुलगी असल्याने या घटनेने संपूर्ण सांगळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.