Sun, Sep 23, 2018 20:44होमपेज › Konkan › गुहागरमध्ये भूकंप

गुहागरमध्ये भूकंप

Published On: Dec 08 2017 1:39AM | Last Updated: Dec 07 2017 10:49PM

बुकमार्क करा

गुहागर : प्रतिनिधी

गुहागर परिसर बुधवारी मध्यरात्री भूकंपाने हादरून गेला. ‘ओखी’ वादळामुळे किनारपट्टी भीतीच्या छायेखाली असतानाच बुधवारी रात्री 1 वाजून 9 मिनिटांनी गुहागरमध्ये भूकंपाचा धक्‍का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.9 इतकी होती. यामुळे मध्यरात्री अनेकजण घाबरून घराबाहेर पडले.

बुधवारी रात्री 1.09 वाजता मोठा आवाज झाला. यामुळे गुहागरमध्ये घबराट पसरली. अनेकजण घराबाहेर पडले. यानंतर हा भूकंप असल्याचे लक्षात आले. हा सौम्य स्वरूपाचा भूकंपाचा धक्‍का होता. गुहागरच्या दक्षिणेला तीन कि.मी. अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून त्याची खोली 14 कि.मी. आहे. या भूकंपाचे हादरे गुहागर तालुका परिसरात जाणवले. आधीच ‘ओखी’ वादळामुळे सागरी किनार्‍यावरील वस्तीमध्ये घबराट निर्माण झाली असताना या भूकंपाने त्यात भर घातली आहे. भूकंप जाणवल्यानंतर परिसरात व्हॉटस् अ‍ॅपवर संदेश फिरू लागले. घराबाहेरच बसून राहा. भूकंप झाला आहे, अशा स्वरूपाचे संदेश मध्यरात्री सातत्याने प्रसारित होत होते. त्यामुळे गुहागर परिसरात घबराट निर्माण झाली.