Thu, Sep 20, 2018 12:17



होमपेज › Konkan › ‘जीएसटी’ विभागातील कर्मचार्‍यांचे सामूहिक रजा आंदोलन 

‘जीएसटी’ विभागातील कर्मचार्‍यांचे सामूहिक रजा आंदोलन 

Published On: Jan 05 2018 1:15AM | Last Updated: Jan 04 2018 11:59PM

बुकमार्क करा




सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे विविध मार्गाने आंदोलने करूनही शासनाने मागण्या मान्य न झाल्याने या कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधन्यासाठी सामुईक रजा आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वस्तू व सेवा कार्यालयात शुकशुकाट होता.

4 व 5 जानेवारी या कालावधीत हे सामायिक रजा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस.व्ही. घाडीगावकर यांनी दिली. त्यानुसार हे सामूहिक रजा आंदोलन सुरू झाले असून गुरुवारी कार्यालयात कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नव्हते. परिणामी जिल्हाभरातून कामानिमित्त दाखल झालेल्या नागरिकांना रिकामी हाताने मागे परतावे लागले.

वस्तू व सेवा कर विभागातील गट-ड संवर्गातील रिक्‍त पदे भरावीत, वेतन त्रुटीचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत, राज्यकर सहआयुक्त व राज्यकर उपायुक्‍त संवर्गातील कुठिरता दूर करावी, सेवा भरती नियमांमध्ये बदल करताना संघटनांना विश्वासात घ्यावे, वस्तू व सेवा कर विभागात केंद्राच्या धर्तीवर समान काम, समान पदे व समान वेतन ही त्रिसूत्री लागु करावी, विभागातील संवर्ग वाटप व संरचना अधिनियमामधुन राज्यकर विभागास कायमस्वरूपी सूट दयावी या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांकडे शासनेचे लक्ष वेधन्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे सामूहिक रजा आंदोलन छेडण्यात येत आहे. यापूर्वी  4 ते 8 डिसेंबर या कालावधीत काळ्या फीती लावून काम केले होते.