Wed, Feb 20, 2019 01:25होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात होणार विमानतळ!

सिंधुदुर्गात होणार विमानतळ!

Published On: Dec 21 2017 6:50PM | Last Updated: Dec 21 2017 6:50PM

बुकमार्क करा

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

केंद्र सरकारने देशात १९ ग्रीनफिल्‍ड विमानतळांना तत्‍वत: मान्यता दिली आहे. सार्वजनिक व खासगी भागीदारीतून (पीपीपी) उभारण्यात येणार्‍या या विमानतळांत महाराष्‍ट्रातील सिंधुदुर्ग येथील विमानतळाचा समावेश आहे. याबाबत नागरी हवाई उड्‍डान मंत्री अशोक गजपती राजू यांनी लोकसभेत माहिती दिली. 

देशातील नागरी हवाई क्षेत्राचा झपाट्याने विस्‍तार होत असून सोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष पुरविले जात असल्याचे राजू यांनी लोकसभेत सांगितले. सिंधुदर्गासह महाराष्‍ट्रातील नवी मुंबईचाही या यादीत समावेश आहे. तसेच मोपा(गोवा), हासन(कर्नाटक), धोलेरा(गुजरात) आदी १९ ठिकाणी ग्रीनफिल्‍ड विमानतळांची उभारणी करण्यात येणार आहे. 

या विमानतळांसाठी राज्य सरकारचीही मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून यामुळे हवाई प्रवास करणार्‍यांच्या संख्येत वाढ होणार असल्याचेही राजू यांनी सांगितले. 

सिंधुदुर्गात ग्रीनफिल्‍ड विमानतळ झाल्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.