होमपेज › Konkan › रत्‍नागिरीत समुद्राच्या पाण्याला हिरवा रंग

रत्‍नागिरीत समुद्राच्या पाण्याला हिरवा रंग

Published On: Feb 24 2018 9:24PM | Last Updated: Feb 24 2018 9:14PMशृंगारतळी : वार्ताहर

गुहागर तालुक्यातील अडूर येथे समुद्राच्या पाण्याचा रंग अचानकपणे हिरवा झाल्याने मच्छीमारांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, हा रंग कसा आला याचे गूढ उलगडू शकले 
नाही.

काही दिवसांपूर्वी वेळणेश्‍वर समुद्रामध्ये पाणी पेटत असल्याचे मच्छीमार व ग्रामस्थांच्या लक्षात आले होेते. त्याची चौकशी करता तो लाटांनी समुद्रात फिरणार्‍या लाल माशांचा रंग होता. त्यामुळे पाणी पेटल्यासारखे भासत होते. परंतु, अडूर या ठिकाणी समुद्राच्या पाण्याचा रंग नेहमीपेक्षा बदलून तो हिरवा झाल्याचे आढळून आले. किनार्‍यावर उसळणार्‍या लाटांमुळे संपूर्ण परिसर हिरवा झाला होता. मात्र, अडूर वगळता तालुक्यात इतरत्र समुद्राचे पाणी नेहमीसारखे होते. यामुळे अडूर किनारील पाणी हिरवे कसे काय, अशी चर्चा मच्छीमारांमध्ये सुरू आहे. या रंगामुळे मासेमारी करणे कठीण होते की काय अशी भीती व्यक्‍त होत आहे.