कणकवली : प्रतिनिधी
कणकवली नाथ पै नगर येथील बाळकृष्ण देसाई यांच्या घराशेजारील परिसरात सुक्या कचर्याला अज्ञाताने आग लावली. लगतच गवताला या आगीची झळ लागल्याने गवत पेटून आगीने रौद्ररूप धारण केले. ही घटना शुक्रवारी रात्री 12 वा सुमारास घडली .सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नाही. रात्री 8.30 वा .सुमारास कचरा पेटत असल्याचे काहींनी पाहिले होते. ती आग लगतच्या गवताला लागल्याने हळूहळू वाढत गेली.
ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला असता नरडवे रोडवर उभ्या असलेल्या काही नागरिकांनी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने विद्युत पोला जवळील आग विजवली. मात्र इतरत्र लागलेली आग मोठी असल्याने न .प.च्या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने कर्मचार्यानी ती विझवली. शिवसेनेचे अजित काणेकर , संदेश मयेकर,हर्षद पारकर ,सौरभ बर्डे,श्री.देसाई,अनिल मुंज, बाबा बर्डे,आदींनी मदत कार्य केले.