Thu, Jun 27, 2019 13:43होमपेज › Konkan › कुडाळमध्येे गोवा बनावटीचा दारू साठा जप्‍त

कुडाळमध्येे गोवा बनावटीचा दारू साठा जप्‍त

Published On: Apr 11 2018 8:17PM | Last Updated: Apr 11 2018 7:54PMकुडाळः राजाराम परब     

कुडाळ तालुक्यातील कामळेवीर बाजारपेठ येथे स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेने बुधवारी पहाटे सापळा रचून गोवा बनावटीच्या दारूसह 7 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी पहाटे पोलिसांनी पाठलाग करून ही कारवाई केली. यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून जाण्यात एकजण यशस्वी झाला. या कारवाईत पोलिसांना 1 लाख 88 हजार किमतीची दारू व 5 लाख 50 हजार किमतीची स्विफ्ट कार जप्त केली.

या कारच्‍या चालकाला पोलिसांनी ताब्‍यात घेतले असून, याच कारमधून नेहमी चोरटया दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या गाडीला थांबण्याचा इशारा करताच गाडीचालकाचे पळून जाण्याचा प्रयत्‍न केला होता, पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून गाडीला बाजारपेठेत पकडले.

Tags : goa made liquor, seized,Kudal, konkan news