Fri, Apr 26, 2019 03:53होमपेज › Konkan › स्कॉर्पिओ उलटून  सात जखमी

स्कॉर्पिओ उलटून  सात जखमी

Published On: Jan 06 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 11:13PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

गणपतीपुळे नजीकच्या भंडारपुळे येथे स्कॉर्पिओ उलटून चालकासह सातजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दि. 5 जानेवारी रोजी सकाळी घडला. जखमींवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे अशी :  अश्‍विनी मंगेश वाडेकर (वय 18), अमृता संदीप पावसकर (18, दोघेही  रा. वाडेकरवाडी नाचणे, रत्नागिरी),  प्रतीक महेश खैरे (18, रा. उद्यमनगर, रत्नागिरी), आदिश्री सुधीर धुळप (18, रा. नाखरे, रत्नागिरी), तृप्‍ती देवेंद्र भाटकर,  संदीप भिकाजी गुरव (18, दोघेही रा. तोणदे, रत्नागिरी) आणि स्कॉर्पिओ चालक साळवी यांचा समावेश आहे.

शुक्रवारी हे सर्वजण स्कॉर्पिओ ने गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी जात होते. त्यांची गाडी भरधाव वेगाने गणपतीपुळेच्या दिशेने जात असताना भंडारपुळे येथे चालकाचा  ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात गाडीतील सर्वजण जखमी झाले.