Sat, Feb 23, 2019 16:19होमपेज › Konkan › रोजगार हमी योजनेचा अभियंता लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात

रोजगार हमी योजनेचा अभियंता लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 11:46PM

बुकमार्क करा
देवगड : प्रतिनिधी

पाटगाव ग्रामपंचायतीमधील रोजगार सेवकाकडून रस्त्याच्या कामाचे मोजमाप व मूल्यांकन करून देण्याकरिता देवगड पं. स.मधील रोजगार हमी योजना विभागाचा स्थापत्य अभियंता सदानंद सत्यवान चव्हाण (वय 26) याला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई देवगड पंचायत समिती येथे शनिवारी दुपारी 12.47 वा. च्या सुमारास केली. नवीन वर्षातील लाचलुचपत विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेली ही पहिलीच कारवाई  आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटगाव ग्रामपंचायतीमधील रोजगार सेवक हे देवगड पं. स.मधील महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभागामध्ये कंत्राटी पद्धतीवर असलेले स्थापत्य अभियंता सदानंद सत्यवान चव्हाण याच्याकडे रस्त्याच्या कामाचे मस्टर सादर करण्यासाठी गेले होते.