Tue, Apr 23, 2019 02:00होमपेज › Konkan › शिवसेनाप्रमुखांमुळेच मंत्री झालो : रवींद्र माने

शिवसेनाप्रमुखांमुळेच मंत्री झालो : रवींद्र माने

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 8:48PM

बुकमार्क करा
लांजा : प्रतिनिधी 

आईवडिलांमुळे व शिवसेनेमुळे मी आमदार झालो.शिवसेनाप्रमुखांमुळेच मंत्री झालो. त्यामुळे आंबव येथे अद्ययावत इंजिनियर कॉलेज उभारू शकलो म्हणूनच आतापर्यंत लांजा व संगमेश्‍वर तालुक्यातील साडे तेराशे विद्यार्थी इंजिनियर होऊ शकले, असे प्रतिपादन माजी मंत्री रवींद्र माने यांनी लांजा येथे केले.

लांजा येथे शिवसेना व युवा सेनेच्या वतीने काकासाहेब सरफरे स्मृतीप्रित्यर्थ एस.एस. सी. व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचा समारोप रविवारी लांजात झाला. यावेळी बोलताना रवींद्र माने यांनी हे प्रतिपादन केले. त्यांनी एस. एस. सी. व्याख्यानमाला पुन्हा सुरु केल्याबद्दल शिवसैनिकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक उद्योजक सुबोध सरफरे, सभापती दीपाली दळवी, दत्ता कदम रोहन बने,चंद्रकांत मणचेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या व्याख्यानमालेत मुंबईतील नामांकित ज्येष्ठ शिक्षक डी. ए.हातगे, लुबाळे, तळेकर, प्रशांत राणे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या व्याख्यानमालेचा लांजा तालुक्यातील दहावीच्या 1600 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. दहावीनंतर काय आणि कोणते क्षेत्र निवडावे, याबात यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.