Wed, Nov 14, 2018 08:00होमपेज › Konkan › खेड नगर परिषदेला एक कोटींचा निधी

खेड नगर परिषदेला एक कोटींचा निधी

Published On: Mar 09 2018 11:28PM | Last Updated: Mar 09 2018 9:26PMखेड : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाकडून खेड नगरपालिकेला विशेष रस्ता अनुदान म्हणून एक कोटी रूपयांचा निधी मिळणार असून त्यासाठी नगर विकास विभागाने दि.22 फेब्रुवारी 2018 रोजी शासन निर्णय घेतल्याची माहिती शिवसेनेचे पालिकेतील गटनेते बाळा खेडेकर यांनी पत्रकारांना दिली. शिवसेनेचे नगरसेवक व मंत्री यांनी केलेल्या पाठपुराव्या नंतर हा निधी प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना बाळा खेडेकर म्हणाले, राज्यातील नगर परिषदांना सन2017-18 करिता विशेष रस्ता अनुदान म्हणून 194.75 कोटी वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत घेण्यात आला होता. या निर्णयानंतर खेड नगर पालिकेला या अनुदानातून निधी मिळावा, यासाठी शिवसेनेचे नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालिकेतील सर्व नगरसेवक यांनी प्रयत्न केले. त्यामुळे खेड नगरपालिकेला विशेष रस्ता अनुदान म्हणून एक कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे.