Thu, Feb 21, 2019 11:32होमपेज › Konkan › माळरानावर अग्‍नितांडव

माळरानावर अग्‍नितांडव

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 11:06PMमालवण/वेंगुर्ले/देवगड : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी अग्‍नितांडव झाले. वेंगुर्ले-गाडीअड्डा, देवगड तालुक्यातील निरोम सडा आणि मालवण तालुक्यातील साळेलच्या माळरानावर तब्बल 4 हजार आंबा व काजू कलमे आगीच्या भक्षस्थानी पडली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन आंबा व काजू पीक घेण्याच्या हंगामातच हे अग्‍नितांडव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

वेंगुर्ले-गाडीअड्डा येथील शेजारीच असलेल्या डोंगरावरील सड्याला मंगळवारी सकाळी 11 वा. सुमारास अचानक आग लागली. या आगीने हा हा म्हणता संपूर्ण सडाभर पसरत त्या ठिकाणी आगीचे तांडव उभे केले. त्यानंतर ही आग डोंगरावरील हनुमान मंदिर भागात पोहोचली. याबाबत तत्काळ माहिती मिळताच वेंगुर्ले न.प.च्या अग्‍निशामक बंबाने धाव घेत ही आग काही प्रमाणात आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग गाडी अड्डा मारुती मंदिरपासून ते तांबळेश्‍वर दाभोलीपर्यंत पसरली. आगीत आंबा व काजूची 200 कलमे  खाक झाली.