Sat, Mar 23, 2019 02:09



होमपेज › Konkan › घावनळेत 12 एकरवरील आंबा-काजू बाग भस्मसात

घावनळेत 12 एकरवरील आंबा-काजू बाग भस्मसात

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:00PM

बुकमार्क करा





कुडाळ ः वार्ताहर
घावनळे-पोशयेवाडी येथील गुंडू अनंत कोरगांवकर यांच्या नमसवाडीमधील 12 एकरमध्ये  विस्तारलेल्या बागेला सोमवारी आग लागली. या आगीत आंबा, काजू व माडाची झाडे जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले. आंबा-काजूला   फुलोरा येत असतानाच कलमे आगीच्या भक्षस्थानी पडल्याने कोरगांवकर कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले. या बाबत गुंडू कोरगांवकर यांना अज्ञाताने आपल्या बागेत आग लावल्याची फिर्याद दिल्यावरून  चार जणांविरोधात कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले. 

गुंडू कोरगांवकर यांनी मोठ्या कष्टाने नमसवाडी येथे ही बाग फुलवली होती. गेल्या वर्षीही या बागेला लाग लागून नुकसान झाले होते,  त्या नंतर पुन्हा  त्याच  ठिकाणी नवीन झाडांची लागवड करून त्यांनी सिंचनासाठी पाईपलाईनही बसवली होती. सोमवारी दुपारी बागेला आग लागल्याची माहिती मिळताच कोरगांवकर कुटुंबियांनी बागेकडे धाव घेतली आणि आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र दुपारच्या वेळेत आग लागल्यामुळे भर उन्हात आगीची तीव्रता वाढली आणि जवळपास 12 एकरमधील आंबा-काजू, नारळ झाडे आगीच्या भक्षस्थानी गेली. बागेत वासुदेव मालवणकर  हे ग्रासकटरने गवत काढणीचे काम करत होते. यावेळी दुपारी 12 वा. च्या सुमारास अज्ञात चारजण बागेत येवून आग लावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  यानंतर त्यांनी तत्काळ कोरगावकर यांना माहिती दिली. कोरगांवकर बागेत येईपर्यंत पूर्ण बागेत आगीने वेढा घेतला होता. यामध्ये  त्यांचे 12 एकर जागेतील 1 हजार काजू कलमे, 200 आंबा कलमे, नारळ झाडे 15 हजार रू. किंमतीचे पाईपलाईन असे जळून नुकसान झाले.