Mon, Mar 25, 2019 17:25होमपेज › Konkan › रत्‍नागिरी : खेड तालुक्यातील शिर्शीत वणवा; लाखोंची हानी(video)

रत्‍नागिरी : खेड तालुक्यातील शिर्शीत वणवा; लाखोंची हानी(video)

Published On: Feb 25 2018 10:11PM | Last Updated: Feb 25 2018 10:11PMगिमवी : लक्ष्मीकांत घोणसे पाटील

खेड तालुक्यातील शिर्शी येथे लागलेल्या वणव्याने हाहाकार उडाला आहे. यात दोन जनावरांचे गोठे, भाताच्या उडव्या, रिक्षा आणि एका घराला वणव्याची हानी पोहोचली आहे. २० ते २५ एकर परिसर वणव्यात जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

या वणव्यामुळे शिर्शीसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावातील तरुणांनी गोठ्यातील जनावरे सोडून बाहेर काढल्याने जनावरे वाचली आहेत. अग्निशामक गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. 

खेडपासून २५ किलोमीटर अंतरावर खाडी पट्ट्यातील जंगलमय भागात शिर्शी हे गाव आहे.