Sun, Jan 20, 2019 18:27होमपेज › Konkan › भरणी-बिडवाडी माळरानावर वणवा

भरणी-बिडवाडी माळरानावर वणवा

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:11PMकणकवली : प्रतिनिधी

भरणी-बिडवाडी सीमेवरील हुंबरणे खरी येथील माळरानाला मंगळवारी सायंकाळी उशिरा प्रचंड आग लागून वणवा पेटला. भरणी पोलिस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर यांना हे आगीचे भयानक तांडव दृष्टीक्षेपात पडताच त्यांनी तात्काळ जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला संपर्क साधल्यानंतर कणकवली नगरपंचायतीचा अग्नीशमन बंब काही वेळातच घटनास्थळी दाखल झाला. बंब आणि ग्रामस्थांच्या मदतीने  आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे भरणी-बिडवाडी, हुंबरणेवाडी, कुवळे, वीरवाडी, येड्याची बाव या परिसरातील तसेच आजूबाजूच्या काजूबागांचे लाखोंचे नुकसान टळले. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे समन्वयक सौ. राजी सामंत, कणकवलीचे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, कणकवलीचे मंडळ अधिकारी श्री. गवस, तलाठी निलीमा सावंत, भरणी तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिल बागवे, सुनिल बागवे, सुरेश साटम, दिपक शेट्ये, पप्प्या बागवे, बाळा जगताप, अनिकेत गुरव, प्रभाकर गुरव, श्री. चिंचवलकर तसेच हुंबरणेवाडी ग्रामस्थ यांचे आग विझविण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.