Sun, Aug 25, 2019 12:33होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात‘नेत्र बँक’स्थापनेसाठी प्रयत्न

सिंधुदुर्गात‘नेत्र बँक’स्थापनेसाठी प्रयत्न

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:32PMसावंतवाडी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानवी अवयव दानाबरोबर नेत्रदान बँकेसाठी नॅब या संस्थेसह जिल्हा प्रशासनाची मदत घेणार असल्याचे ऑर्गन अ‍ॅण्ड बॉडी 
फाऊंडेशनचे अध्यक्ष आनंदराय केणी यांनी सांगितले.

ते स्नेह नागरी पतसंस्थेच्या सभागृहात बोलत होते. फाऊंडेशनचे पदाधिकारी सुधीर बागायतकर, उमाकांत सावंत, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, अनंत उचगांवकर, सोमकांत जिगजिन्नी, सत्यजित धारणकर -  देशमुख आदी उपस्थित होते. अवयव दान प्रचार आणि प्रसारासाठी या वेलफेअर फाऊंडेशनची स्थापना झाली असून मुंबई ते गोवा अशी प्रचार पदयात्रा 23 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. ही पदयात्रा 9 एप्रिलला सावंतवाडीत तर 15 एप्रिलला मडगाव-गोवा येथे पोहोचणार आहे. या पदयात्रेत ज्येष्ठ नागरीकांचा समावेश आहे. 1 एप्रिलला कणकवलीत दाखल होणार्‍या या पदयात्रेत जिल्ह्यातील डॉक्टर, वकील व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. 

3 एप्रिलला मालवण, 7 ला कुडाळ, 8 ला वेंगुर्ले, 9 ला सावंतवाडी, 10 ला बांदा अशी ही पदयात्रा दाखल होणार  आहे. अवयव दानामुळे जाळून फुकट जाणारा देह गरजवंतांच्या कामी येतो.  मेंदू, हृदय, आतडे, फुफ्फुस, किडनी व त्वचा आदी अवयव मरणात्तर दान करता येतात. तर मरणानंतर आणि जिवंत असताही नेत्रदान करता येऊ शकते, असे आनंदराय केणी म्हणाले.

राज्यस्तरीय सोटो व रोटो या संस्था एकत्रितपणे काम करीत असून सिंधुदुर्गात नेत्रदान बँक सुरु करण्यासाठी फ ाऊंडेशन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातात तसेच ह्दय बंद पडून मृत्यू झाल्यासही अवयवदान करता येते. 50 टक्के भाजलेल्या व्यक्तीचा झालेला मृत्यू हा भाजल्याने झालेल्या इनफेक्शनमुळे होतो. त्याला त्वचादानामुळे जीवदान मिळते. मानवी त्वचा पाच वर्षे सुरक्षित साठवून ठेवता येऊ शकते. नेत्रदानातून अंधाला दृष्टी मिळते. मानवी अवयव दान मृत्यूपश्‍चात करण्याची श्रीलंका या देशाची संस्कृती आहे. भारतातही याबाबत जनजागृती करण्यासाठी हा महासंघ प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.