Sun, Jun 16, 2019 13:10
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षा आज

मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षा आज

Published On: Jan 06 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 10:54PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

‘महाराष्ट्र बंद’मुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची शनिवारी विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाने गुरुवारी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. बंदमुळे सुमारे 40 टक्के विद्यार्थी बुधवारी परीक्षा देऊ शकले नव्हते. 

मुंबई विद्यापीठाच्या सत्र पाचच्या परीक्षा बुधवारी होत्या. त्यांपैकी अनेक परीक्षा या ‘आयडॉल’ तर्फे  घेण्यात येणार होत्या. त्यात विधी विषयांच्या पेपरचाही समावेश होता. सकाळी झालेल्या परीक्षेला बर्‍यापैकी विद्यार्थी उपस्थित होते; मात्र, दुपारी घेण्यात आलेल्या परीक्षांसाठी विद्यार्थी पोहोचू शकले नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्‍त करण्यात येत होता.

मुंबईत तणावाचे वातावरण असूनही विद्यापीठाने परीक्षा रद्द न केल्याबद्दल अनेक विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्‍त केली होती. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने हा निर्णय घेतला.

विशेष परीक्षा होणारे विषय : सकाळी - टी.वाय.बी.कॉम., एम.एस्सी. (फॉरेन्सिक सायन्स) (सत्र 1), एम.एस्सी. (पार्ट 1), एम.सी.ए. (सत्र 2). दुपारी - तृतीय वर्ष कला शाखा, एम.एड्. (स्पेशल एज्युकेशन) (एचआय- सत्र 1), एम.ए. (पार्ट 1 आणि 2), बी.कॉम. (सत्र 6), एम.कॉम. (पार्ट 1), टी.वाय.बी.एस्सी, बीएस्सी. (आयटी) (सत्र 5), एम.सी.ए. (सत्र 4), तीन वर्षांचा एल.एल.बी. अभ्यासक्रम (सत्र 3), चार वर्षांचा एल.एल.बी. अभ्यासक्रम (सत्र 7). अशा परीक्षा होणार आहेत.