Tue, Jul 23, 2019 02:48होमपेज › Konkan › स्पर्धा परीक्षा शिबिर भवितव्य घडविणारे

स्पर्धा परीक्षा शिबिर भवितव्य घडविणारे

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:27PMकणकवली ; प्रतिनिधी 

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर हे कोकणचे भवितव्य घडविणारे आहे़ आयएएस, आयपीएस अधिकारी घडावेत हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे स्वप्न आहे़  कोकणातील उच्चपदस्थ अधिकारी असले  तर त्याचा फायदा सिंधुदुर्गच्या विकासासाठी होणार आहे़    त्यामुळे कोकण विकासाच्या भविष्यासाठी हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा कार्यक्रम गुंतवणुकीचा असल्याचे प्रतिपादन आ़  नितेश राणे यांनी केले़

कणकवली मराठा मंडळ सभागृहात आ़  नितेश राणे व द युनिक अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्‍त विद्यमाने रविवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़  युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रा़ तुकाराम जाधव,  जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जि. प़  उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी जि. प़ अध्यक्ष गोट्या सावंत, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, कणकवली सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, अशोक सावंत, सुदन बांदिवडेकर, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, अमोल तेली, अ‍ॅड. अविनाश माणगांवकर, प्रकाश राणे, स्वाती राणे, मनिष दळवी, प्रा़  राजकुमार पाटील, प्रा़  डॉ़  अमित अहिरे, प्रा़  संतोष कांबळे, डॉ़  मिलिंद कुलकर्णी, समन्वयक अमोल गवळी आदी पदाधिकारी व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ 

आ़  नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण-तरूणी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांमध्ये उतरली पाहिजेत़  स्पर्धा परीक्षांमध्ये  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तरच उद्याच्या महाराष्ट्राला आणि देशाला कोकणातले अधिकारी दिसणार आहेत़   सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी पुणे, कोल्हापूरशिवाय मार्ग नसतो़ त्यामुळे आज मार्गदर्शन शिबिराला लाभलेला प्रतिसाद पाहून प्रा़  तुकाराम जाधव यांनी कणकवलीत द युनिकचे केंद्र लवकरात सुरु लवकर करावे़   या केंद्रातील विद्यार्थी ज्यावेळी सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी किंवा अधिकारी येतील़, यावेळी आम्हाला समाधान वाटेल, अशी भावना  आ़ नितेश राणे यांनी व्यक्‍त केली.  सतीश सावंत, प्रा़  तुकाराम जाधव यांनीही मार्गदर्शन केले.  सूत्रसंचलन डॉ़ मिलिंद कुलकर्णी यांनी केले. आभार अमोल गवे यांनी मानले.