Sun, Mar 24, 2019 22:55
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › कोकणच्या रानावनात भडकतोय वणवा

कोकणच्या रानावनात भडकतोय वणवा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात कोकणात मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. सध्या कोकणातील डोंगर वणव्यात जळताना पहायला मिळत आहेत. मुंबई गोवा महामार्ग, चिपळूण-गुहागर रस्ता, दापोली-मंडणगड मार्ग यासह संपूर्ण जिल्ह्यात वणवे लागलेले पहायला मिळत आहेत. या मार्गावरून प्रवास करताना वणवे पहायला मिळत आहेत. भात शेतीच्या मशागतीचे (भाजावळीचे) काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. वर्षानुवर्षे या समस्येने कोकणाला ग्रासले आहे. मात्र, याबाबत वन खाते अजूनही जागे झालेले नाही. कोकणातील प्रमुख फळपिक आंबा आणि काजूचे या वणव्यात मोठे नुकसान होत आहे. याशिवाय डोंगर जळून खाक होत आहेत. 

येथील शेतकरी दरवर्षी फेब्रुवारी ते मे या कालावधीत भात शेतीची मशागत करतो. शेतकरी आपल्या शेतात भाजावळीसाठी आग लावून जातो आणि काही वेळा हा वणवा भडकतो. यात  कित्येक एकर जमिनीवर वणवा पसरतो. यात झाडे झुडपे होरपळून जातात. आंबा, काजू, फणस,कोकम, बांबू, ऐन, साग, रानमेवा यांचे मोठे नुकसान होते. कोकणात सध्या मोठ्या प्रमाणावर शंभर टक्के अनुदानावर फळ झाड लागवड योजना राबविण्यात येत आहे. यामुळे हजारो एकर जमीन फळझाड लागवडीखाली येत आहे. 

मात्र, वणव्याच्या समस्येने या योजनेला ग्रहण लागलेले आहे. दरवर्षी या बागा आगीत होरपळत आहेत. यामुळे येथील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. माजी पालकमंत्री आणि माजी वन राज्यमंत्री आ. भास्कर जाधव यांनी या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याबाबत वन विभागाने जनजागृती करावी असा प्रयत्न झाला. मात्र, त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले.

Tags : Konkan, Konkan News,  every year, huge quantities, forest fire, Konkan


  •