होमपेज › Konkan › हेवाळेत हत्तींचा धुडगूस सुरूच; हजारो केळी रोपे तुडवली

हेवाळेत हत्तींचा धुडगूस सुरूच; हजारो केळी रोपे तुडवली

Published On: Jun 01 2018 11:01PM | Last Updated: Jun 01 2018 10:31PMदोडामार्ग : प्रतिनिधी

हेवाळे-राणेवाडी येथील सिद्धेश राणे यांचे पाच दिवसांत हत्तींनी सहा लाखांचे नुकसान केले आहे. एक हजार केळी लागवड जमीनदोस्त केली.गुरुवारी रात्री 8 वा. हत्तींनी बागायतीत प्रवेश करून प्रचंड नुकसान केले.

सिद्धेश राणे या सुशिक्षित बेरोजगार युवकाने बँकेचे कर्ज घेऊन राणेवाडीपासून 2 कि.मी. च्या अंतरावर नदीप्रवाहाच्या बाजूला केळीची बाग केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हत्ती याच बागेत येत आहेत. अवघ्या काही दिवसांत परिपक्व केळी तोडण्यात येणार होत्या, पण हत्तींचा कळप बागायतीत घुसून केळीची झाडे मोडत आहेत. एकीकडे लाखो रुपयांचे नुकसान आणि दुसर्‍या बाजूने बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.