होमपेज › Konkan › आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत

आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत

Published On: Dec 08 2017 1:39AM | Last Updated: Dec 07 2017 10:45PM

बुकमार्क करा

गुहागर : प्रतिनिधी

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. 8 रोजी या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. दि. 3 जानेवारीला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

गुहागर नगरपंचाययत निवडणुकीकडे राष्ट्रवादीसह भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. या न.पं.ची मुदत 1 एप्रिल 2018 रोजी संपणार आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. या निवडणुकीसाठी 17 प्रभाग निश्‍चित झाले आहेत.

 त्यासाठी 8 रोजी प्रभागनुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. दि. 29 नोव्हेंबरपर्यंत शहरात प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. 2011 च्या जनगणनेनुसार प्रभागांचा नकाशा तयार करण्यात आला. येथील मुख्याधिकारी, तहसीलदार व निवडणूक अधिकार्‍यांमार्फत ही यंत्रणा राबविण्यात आली.  आता दि. 8 रोजी मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय सदस्यांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे