होमपेज › Konkan › राजापूर : कुणी उमेदवार देता का उमेदवार?

राजापूर : कुणी उमेदवार देता का उमेदवार?

Published On: Feb 15 2018 10:30PM | Last Updated: Feb 15 2018 10:22PM
राजापूर : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील पोटनिवडणुका होत असलेल्या 23 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींतून पाच जागांसाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 
त्यामुळे उर्वरित जागा पुन्हा एकदा रिक्‍त राहणार आहेत.

विविध कारणांमुळे रिक्‍त असलेल्या तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या 33 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये पन्हळे तर्फे सौंदळ, तारळ, वाल्ये, पांगरे खुर्द, चुनाकोळवण, पेंडखळे, कोंडसर बु॥, शेढे, अणसुरे, सागवे, देवाचे गोठणे, शिवणे बुद्रुक, ओझर, प्रिंदावन, कोळवणखडी, देवीहसोळ, नाणार, हातिवले, हसोळ तर्फ सौंदळ, शिवणेखुर्द, शेजवली, साखरीनाटे, वडदहसोळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी सोमवार दि.12 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली होती.

या मुदतीत केवळ 5 ग्रामपंचायतींतून 7 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रिंदावनमधील 3 जागांसाठी 1 अर्ज, सागवे येथील 1 जागेसाठी 3 अर्ज तर ओझर, देवाचे गोठणे व अणसुरे येथील प्रत्येकी 1 जागेसाठी 1 अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतीतील जागा पुन्हा एकदा रिक्‍त राहणार आहेत.

दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली असून सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. आता दि.16 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची मुदत असून आवश्यकता भासल्यास दि.27 रोजी मतदान व दि.28 रोजी मतमोजणी होणार आहे.