Mon, Mar 25, 2019 17:27होमपेज › Konkan › दोन ठिकाणच्या छाप्यात ८ हजारांची दारू जप्त 

दोन ठिकाणच्या छाप्यात ८ हजारांची दारू जप्त 

Published On: May 09 2018 11:55PM | Last Updated: May 09 2018 11:55PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीतील काळाबादेवी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या विषेश पथकाने दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात देशी, विदेशी दारुचा मोठा साठा जप्त केला आला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ७ हजार ६६४ रु.चे मद्य जप्त करण्यात आले आहे.

काळाबादेवी मयेकरवाडीत मोठ्याप्रमाणत विदेशी दारुचा व्यावसाय सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहिरतीच्या आधारे पोलिस उपनिरिक्षक रविराज फडणीस, कर्मचारी वैभव मोरे, उदय वाजे, अरुण चौके, संजय जाधव यांनी छापा टाकला. जालंदर मयेकर याच्याकडून ३ हजार ९२८ रुपयांची  बिअर जप्त करण्यात आली. तर, महेश जोशी याच्याकडून ब्लू विस्की, हायवर्ड होडका, व्हिस्की, इंपीरीयल ब्लू, डिएसपी अशी ३ हजार ७३६ रूपयांची दारु जप्त करण्यात आली.

पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Tags : ratnagiri,  liquor