Thu, Jun 20, 2019 07:22होमपेज › Konkan › शिक्षण खात्याचा ‘विनोद’ झालाय

शिक्षण खात्याचा ‘विनोद’ झालाय

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 9:26PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राज्याच्या शिक्षण खात्याकडून गतवर्षभरात 560 जीआर काढण्यात आले आहेत. शिक्षकांच्या आक्रोशानंतर यातील अनेक जीआर रद्दही करण्यात आले आहेत. शिक्षकांची अशैक्षणिक कामे वाढली असून शिक्षण खात्याचा ‘विनोद’ झाली असल्याची टीका आ. उदय सामंत यांनी केली.

महाराष्ट्र  राज्य   पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा जिल्हा शाखा रत्नागिरीचे जिल्हास्तरीय अधिवेशन येथील श्री स्वामी समर्थ हॉलमध्ये रविवारी आयोजित केले होते. यावेळी शिक्षण सभापती दीपक नागले, पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, उपसभापती सुनील नावळे, अध्यक्ष चंद्रकांत पावसकर, विनायक हातखंबकर, अशोक भालेकर, उदय शिंदे, संतोष पेवेकर आदींसह सर्व पदाधिकारी आणि प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. नाचणे क्र. 1 शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत म्हटले. आ. सामंत यांचा चंद्रकांत पावसकर यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त मानसी गवंडे, जिल्हा पुरस्कारप्राप्त दीपक माळी, सुप्रिया खंडकर, अस्मिता मजगावकर, रघुनाथ गोरे, राजेश गुरव, संजय डांगे, सुधीर जाधव, दिगंबर तेंडुलकर, प्रकाश पवार, विजय विश्‍वासराव, दिलीप देवळेकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आ. सामंत म्हणाले की, ऑनलाईन कामासाठी शिक्षकांनी मागणी केलेल्या डाटा ऑपरेटर्सची नेमणूक अधिवेशनानंतर लगेचच करण्यात येणार आहे. प्रधान सचिव नंदकुमार यांच्याशी याबाबत चर्चा  झाली आहे. सुगम-दुर्गम शाळांची नवीन यादी मंजूर झाली असून पुढील महिन्यात कार्यवाही होणार आहे. शिक्षकांचे कार्य मोठे असून, त्यांनी ठरवले तर देशात परिर्वतन होऊ शकते. शिक्षक मुलांवर संस्कार करतात म्हणूनच मुले संस्कारी होतात. 2200 वर्षे जुन्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक मनोज रेडीज यांनी तर सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले.