होमपेज › Konkan › देवरुख परिसरात भूकंप

देवरुख परिसरात भूकंप

Published On: Jan 17 2018 1:58AM | Last Updated: Jan 16 2018 9:55PM

बुकमार्क करा
देवरुख : प्रतिनिधी

संगमेश्‍वर तालुक्यातील देवरुख परिसराला मंगळवारी दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्‍का जाणवला. आधी या भूकंपाची तीव्रता मोठी असणार अशी भीती वाटत होती. भूकंपाची तीव्रता 3.03 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. कोयनेपासून 22 कि. मी. अंतरावर 9 कि. मी. खोल  वारणा खोर्‍यात जावळे गावाच्या दक्षिणेला या भूकंपाचा केंद्रबिंदू होता असे कोयनेतील अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

पाटण, कराड, कोयना परिसरात संगमेश्‍वर तालुक्यातील काही भागात हा धक्‍का जाणवला. धक्‍का जाणवल्यानंतर काही नागरिक लगेच घरातून बाहेर पडले. वातावरणातील बदलामुळे अलिकडे भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रमाण वाढले आहे.