Mon, May 20, 2019 11:15होमपेज › Konkan › बंधार्‍यात पडून चिमुरडीचा अंत

बंधार्‍यात पडून चिमुरडीचा अंत

Published On: Jan 31 2018 12:00AM | Last Updated: Jan 30 2018 11:55PMराजापूर : प्रतिनिधी

खेळत असताना पाण्याने भरलेल्या बंधार्‍यामध्ये पडून अडीच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील तळवडे, किंजळस्करवाडी  येथे  घडली. अंजली पिंटू माळजे असे या बालिकेचे नाव असून, तिचे  कुटुंबीय हे धुळे जिल्ह्यातील आहेत. ते पाचल परिसरात ऊसतोडीच्या कामासाठी आले होते.
मंगळवारी सकाळी मृत बालिकेचे आई-वडील कामासाठी निघून गेले होते. त्यावेळी घरात लहानगी अंजली व तिची भावंडे होती. घराबाहेर खेळताखेळता ही मुले बाजूला असलेल्या बंधार्‍याजवळ आली. या बंधार्‍यात पाणी असून चुकून तेथे गेलेल्या अंजलीचा पाय घसरून ती पाण्यात पडली.  त्यावेळी तिच्यासमवेत असलेल्या भावंडांनी आरडाओरडा करताच आजूबाजूची मंडळी धावून आली. तिच्या आई-वडिलांना याची माहिती मिळताच तेही धावून आले. त्यानंतर अंजलीला  तातडीने  रुग्णालयात  दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.  याप्रकरणी अंजलीचे वडील पिंटू माळजे यांनी रायपाटण पोलिस दूरक्षेत्रात खबर दिली.

अंजलीचे कुटुंब ऊसतोडीसाठी तळवडे, किंजळस्कर येथे राहात होते. याप्रकरणी रायपाटण पोलिस दूरक्षेत्राचेे हेड कॉ. के. आर. तळेकर अधिक तपास करीत आहेत.