Mon, Apr 22, 2019 03:43होमपेज › Konkan › बांद्यात भटक्या कुत्र्यांनी तोडले वासरांचे लचके

बांद्यात भटक्या कुत्र्यांनी तोडले वासरांचे लचके

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:47PM

बुकमार्क करा
बांदा : वार्ताहर

बांदा शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून या कुत्र्यांपासून पादचार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. बांदा-मुस्लिमवाडी येथील दाऊद आगा यांच्या गुरांच्या गोठ्यातील 2 लहान वासरांचा या कुत्र्यांनी चावा घेतल्याने ही वासरे गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना रविवारी दुपारी घडली.

भटक्या कुत्र्यांनी वासरांचा चावा घेण्याची ही या वाडीतील तिसरी घटना आहे.दाऊद आगा हे नेहमीप्रमाणे दुपारी गुरांना चारा देऊन घरी गेले होते. दुपारनंतर तीन भटक्या कुत्र्यांनी गोठ्यात प्रवेश करत 2 महिने व 4 महिने वयाच्या दोन्ही वासरांचा चावा घेण्यास सुरुवात केली. या कुत्र्यांनी वासरांच्या पायांना व मानेचा लचका तोडला.गुरांच्या ओरडण्याने आगा यांनी तात्काळ याठिकाणी धाव घेत भटक्या कुत्र्यांना हुसकावून लावले.

 या घटनेमध्ये दोन्ही वासरांना गंभीर दुखापत झाली. बांदा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली असून दिवसा तसेच रात्रीच्या वेळी या कुत्र्यांकडून त्रास होत आहे. शहरातील अनेक ठिकाणी पादचार्‍यांना देखील या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. या भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मुस्लिमवाडीत यापूर्वी भटक्या कुत्र्यांकडून वासरांचा चावा घेण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी दाऊद आगा यांनी केली आहे.