होमपेज › Konkan › ‘तंटामुक्त’ अध्यक्षासह भावास पोलिस अधिकार्‍याकडून मारहाण

‘तंटामुक्त’ अध्यक्षासह भावास पोलिस अधिकार्‍याकडून मारहाण

Published On: Apr 09 2018 10:44PM | Last Updated: Apr 09 2018 10:29PMदोडामार्ग : प्रतिनिधी

आडाळी गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष कमलाकर हरी सावंत व त्यांचे भाऊ धोंडू हरी सावंत यांना पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी 3 वा.च्या दरम्यान घडली. 

आडाळी येथील चंद्रावती गणपत सावंत व रघुनाथ सावंत यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी सोमवारी सर्वेअर गेले होते. कमलाकर व धोंडू सावंत हे लगतचे कब्जेदार असल्याने तेथे उपस्थित होते. सर्वेक्षण होताना वादावादी होऊ नये, यासाठी पोलिसही घटनास्थळी हजर होते. जमिनीचे मोजमाप घेताना वाढलेले गवत अडथळा ठरत असल्याने ते जाळण्यासाठी आग लावण्यात आली.