Wed, Nov 21, 2018 16:12होमपेज › Konkan › बालिकेवर अत्याचार तरुणास अटक

बालिकेवर अत्याचार तरुणास अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दोडामार्ग : प्रतिनिधी

एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित सुशील गोविंद परब(45, रा. मणेरी) याला दोडामार्ग पोलिसांनी रविवारी अटक केली. युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबद्दल सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
दोडामार्ग तालुक्यातील एका गावात राहणार्‍या पीडित बालिकेचे वडील कामानिमित्त बाहेर असतात. काही दिवसांपूर्वी तिची आई घराबाहेर गेल्याची संधी साधत संशयित सुशील परब यांने बालिकेच्या घरात जात तिच्याशी लैंगिक चाळे व अत्याचार केला. 

संध्याकाळी घरी परतल्यावर मुलीच्या कपड्यावर रक्त पाहून आई घाबरली. तिने मुलीला विश्‍वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला  प्रकार आईला सांगितला. त्या नंतर पीडित बालिकेला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी पेलिसांची भेट घेत चर्चा केली. पहाटेपर्यंत फिर्याद दाखल करण्याचे कामकाज सुरू होते. या नंतर शनिवारी सकाळी पोलिसांनी सुशील परब याला अटक केली. त्याच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.