Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Konkan › जिल्ह्याला काय शेंगदाणे देताय?

जिल्ह्याला काय शेंगदाणे देताय?

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:45PMरत्नागिरी :प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीने गतवर्षी 171 कोटींचा आराखडा तयार केला होता. यावर्षी मात्र 156 कोटींचाच आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यातच 50 टक्के निधीची कपात होण्याची शक्यता आहे. मग उरलेल्या निधीतून जिल्ह्याला काय शेंगदाणे देणार का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार नीलेश राणे यांनी केला.

येथील ‘रायगड’ या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़  जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीनंतर देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा 156 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री इतिहासातील असे एकमेव पालकमंत्री असावेत की ज्यांनी गतवर्षीच्या आराखड्यापेक्षा यंदाचा आराखडा कमी केला आहे. यांचा कसलाही अभ्यास नाही, कोणावरही अंकुश नाही आणि यांना कोणी विचारतही नाही. यांना जर जिल्हा रसातळाला न्यायचा असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सिंधुदुर्गचा विकास आराखडा 180 कोटींचा आहे. मग रत्नागिरीचा आराखडा कमी का? यांनी प्रस्तावच पाठविले नसल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.

तसेच बाजार समितीचे हे नाके उभारण्यामागे कोणकोण आहेत, याची नावेदेखील आपण लवकरच जाहीर करु. जे बेकायदेशीरपणे हे काम करत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, असेदेखील राणे यांनी यावेळी स्पष्ट केले़