Mon, Mar 25, 2019 05:14
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › देवरुख - येडगेवाडी एसटी बसला अपघात

देवरुख - येडगेवाडी एसटी बसला अपघात

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 9:08PMदेवरूख : वार्ताहर 

संगमेश्‍वर तालुक्यातील राजिवली बौद्धवाडीनजीक रस्त्याच्या कडेला गटारात बस कलंडून अपघात घडला. हा अपघात गुरूवारी सकाळी 9.30 वा. च्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. देवरुख आगारातून सकाळी 6.30 वा सुटणार्‍या देवरुख - येडगेवाडी या बसला सकाळी राजिवली बौद्धवाडीजवळील अवघड वळणावर रस्त्याच्या डाव्या बाजूकडील गटारात बस गेल्याने अपघात झाला चालकांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. 

देवरुख - येडगेवाडी ही शाळेसाठी सुरु केलेली विशेष बस असून या अपघातादरम्यान सुदैवाने शाळेतील विद्यार्थी बसमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला.