Fri, Feb 22, 2019 05:28होमपेज › Konkan › तुळसणीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी ५ संशयित गजाआड

तुळसणीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी ५ संशयित गजाआड

Published On: Apr 27 2018 10:26PM | Last Updated: Apr 27 2018 9:59PMदेवरूख : प्रतिनिधी

नजीकच्या तुळसणी गावातील ईप्सान ऊर्फ राजू इब्राहिम मुकादम या तरुणाचा अमानुष मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणातील 5 फरारी संशयितांना देवरूख पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून अटक केली. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

प्रथम दोघांना व नंतर दोन कामगारांना दापोली तालुक्यातून  ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले होते. तर मुख्य सूत्रधार सादीक कापडी व अन्य 4 असे 5 जण अनेक दिवस फरारी होते. पोलिसांची तीन पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावला होता. त्याचनुसार  सर्व पाच ही फरारींना ठाणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली.ईप्सान ऊर्फ राजू याला काही दिवसांपूर्वी त्याच्या वाडीतीलच काही लोकांनी दुचाकीवरून उचलून नेत लाथा-बुक्यांनी, दांडक्याने मारहाण करीत त्याच्या अंगावर गरम पाणी ओतले होते. 

यात तो गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम देवरूख त्यानंतर रत्नागिरी येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती खालावल्याने त्याला प्रथम कोल्हापूरला हलविण्यात आले. तिथूनही त्याच्या प्रकृतीबाबत साशंकता असल्याने अधिक उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी दि.29 मार्चला त्याचा मृत्यू झालामुख्य सुत्रधार सादीक कापडी, मुअज्जम मुकादम, फिरदोस कापडी, आसफिन मुकादम, जलाल बोट अशी  ठाणे जिल्ह्यातून अटक केलेल्यांची नावे आहेत.