Mon, Aug 19, 2019 11:33होमपेज › Konkan › ‘देवरूख’च्या आखाड्यात होणार चौरंगी लढत?

‘देवरूख’च्या आखाड्यात होणार चौरंगी लढत?

Published On: Mar 19 2018 10:37PM | Last Updated: Mar 19 2018 10:32PMदेवरूख : प्रतिनिधी

देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या अर्ज भरण्याच्या अंतिमदिनी सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नगरसेवक पदासाठी 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामुळे नगरसेवक पदासाठी एकूण 69 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. 

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आघाडी, शिवसेना, भाजप-मनसे-आरपीआय युती व स्वाभिमान पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एकाच दिवशी तब्बल 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आघाडीकडून स्मिता लाड, स्वाभिमान पक्षाकडून मिताली तळेकर, भाजप युतीकडून मृणाल शेट्ये व अपक्ष म्हणून अनघा कांगणे यांनी आपले अर्ज दाखल केले. 

सोमवारी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये  प्रभाग क्रमांक 1 मध्ये संदीप वेलवणकर (भाजप), देवेंद्र पेंढारी (राष्ट्रवादी), प्रभाग  2 मध्ये विद्यमान शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना केसरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच प्रभागामध्ये अश्‍विनी पाताडे (भाजप), प्रभाग 3 मध्ये रेश्मा किर्वे (भाजप), दिपाली करंडे (राष्ट्रवादी), श्रद्धा भोसले (अपक्ष), प्रभाग 4 मध्ये गणेश मोहिते (राष्ट्रवादी), वैभव पवार (शिवसेना), कुंदन कुलकर्णी (भाजप), प्रभाग 5 मध्ये युयुत्सु आर्ते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच प्रभागात संतोष केदारी (भाजप) यांनीही निवडणुकीत उडी घेतली आहे.   

प्रभाग 6 मध्ये मानस जागुष्टे (शिवसेना), नंदकिशोर बेर्डे (अपक्ष), सुधीर यशवंतराव (भाजप), संगीता हातिस्कर (स्वाभिमान). प्रभाग 7 मध्ये सुशांत मुळ्ये (भाजप), तेजश्री मुळ्ये (अपक्ष), प्रभाग 8 मध्ये अनुष्का टिळेकर (शिवसेना), निकिता रेवाळे (भाजप), प्रभाग 9 मध्ये निकिता रहाटे (भाजप), प्रियांका जोगळे  (स्वाभिमान). प्रभाग 10 मध्ये उल्हास नलावडे (राष्ट्रवादी), अमोल सुर्वे (स्वाभिमान), प्रभाग 11 मध्ये प्रेरणा पुसाळकर (राष्ट्रवादी), प्रभाग 12 मध्ये सोनिया धामणस्कर (अपक्ष), रिया शेट्ये (काँग्रेस) यांनी अर्ज दाखल केले आहेत.

प्रभाग 13 श्याम कदम  (राष्ट्रवादी) व वैभव कदम (भाजप), अमोल कडवईकर (अपक्ष), प्रभाग 15 मध्ये रूक्साना बोदले (राष्ट्रवादी), प्रणाली विंचू (स्वाभिमान). प्रभाग 16 मध्ये दीपक खेडेकर (अपक्ष), रामदास निवळकर (अपक्ष), सुरेंद्र पांचाळ (स्वाभिमान) अशा 35 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. काही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र 3 वाजेपर्यंत जोडलेले नाही, यामुळे याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवले असून हे प्रमाणपत्र जोडण्यासाठी छाननी दिनी मुदत मिळते का? हे या मार्गदर्शनातून स्पष्ट होणार आहे. मात्र, ज्यांनी सोमवारी जात वैधता प्रमाणपत्र जोडलेले नाही असे उमेदवार मानसिक तणावाखाली असल्याचे चित्र आहे.

Tags : devrukh, nagarpanchyayat, election