Fri, Jul 19, 2019 19:52होमपेज › Konkan › लग्‍नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लग्‍नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 03 2017 11:19PM

बुकमार्क करा

देवरूख : वार्ताहर

अल्पवयीन मुलीला ओळखीचा गैरफायदा घेत फिरायला नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यातून पीडितेने तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात अपत्याला जन्म दिला आहे. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील संजित बरे (रा. माणगाव) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाने देवरूख पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना एप्रिल 2017 मध्ये घडली आहे. या घटनेतील मुलगीचे वय 17 वर्षे 7 महिने आहे. शनिवारी या मुलीने एका ग्रामीण रुग्णालयात बाळाला जन्म दिला. दरम्यान,  देवरूख पोलिस ठाण्यात संजित बरे याच्याविरोधात भा.दं.वि. कलम 376 व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 212चे कलम 3(अ)(क), 4, 5, जे 2 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.