Thu, Jun 20, 2019 00:45होमपेज › Konkan › दिग्गजांमुळे देवगडमधील निवडणुका लक्षवेधी

दिग्गजांमुळे देवगडमधील निवडणुका लक्षवेधी

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:35PM

बुकमार्क करा

देवगड ः प्रतिनिधी

 देवगड तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 74.22 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 83.23 टक्के मतदान विठ्ठलादेवी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये झाले आहे. या निवडणुकीमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, माजी आमदार प्रमोद जठार, सभापती जयश्री आडीवरेकर यांच्या होमपिचवरील निवडणुका झाल्यामुळे या दिग्गजांना प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

 देवगड तालुक्यातील वळीवंडे, शिरवली, रामेश्‍वर, वानिवडे, पावणाई, फणसगाव व विठ्ठलादेवी या सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान झाले. दुपारनंतर मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. सात ग्रामपंचायतींमधील एकूण 5419 मतदारांपैकी 4022 मतदारांनी मतदान केले. विठ्ठलादेवी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक  83.23 टक्के मतदान झाले. तर शिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचदाच्या निवडणुकीसाठी 67 टक्के मतदान झाले.

तालुक्यातील सात ग्रामपंचायत  या निवडणुकीमध्ये सदस्यपदाच्या 30 जागांसाठी 77 उमेदवार तर  सरपंचपदाच्या 7 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात असून आज नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणी होणार आहे. यावेळी सातही ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.