Wed, Feb 20, 2019 13:14होमपेज › Konkan › दुचाकी अपघातात पडेलचा युवक ठार

दुचाकी अपघातात पडेलचा युवक ठार

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 04 2017 11:13PM

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी

मुंबई-परळ येथील गौरीशंकर मिठाईवाले परिसरात झालेल्या दुचाकीच्या विचित्र अपघातात अक्षय अशोक हेमले (20, मूळ रा. पडेल हेमलेवाडी) हा युवक जागीच ठार झाला. 


पादचार्‍याच्या धक्क्याने दुचाकी घसरल्यानंतर रस्त्यावर फेकल्या गेलेल्या अक्षयच्या डोक्यावरून मागून येणार्‍या टेम्पोचे पुढील चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. फोटोग्राफीसाठी सोबत घेऊन जाणार्‍या सख्ख्या भावालाच अक्षयचा मृत्यू डोळ्यासमोर बघण्याची दुर्दैवी वेळ आली. हा अपघात रविवारी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास घडला.