Tue, Apr 23, 2019 18:12होमपेज › Konkan › सरपंचांवर कारवाईसाठी सौंदाळे ग्रामस्थांचे पं. स. समोर उपोषण

सरपंचांवर कारवाईसाठी सौंदाळे ग्रामस्थांचे पं. स. समोर उपोषण

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 9:15PM

बुकमार्क करा
देवगड : प्रतिनिधी

सौदाळे ग्रामपंचायतीचे सरपंच मोतीराम तावडे  हे  मनमानी कारभार करीत असूनही त्यांच्यावर कारवाई  होत नसल्याच्या निषेधार्थ  सौदाळे ग्रामस्थांनी गुरुवारपासून देवगड पं. स. समोर आमरण उपोषण  सुरू केले. सरपंचाच्या कामात अनियमिततेबददल त्यांना नोटीस काढून त्यांना खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी नोटिसाला कोणतेही उत्तर दिले नसल्याने त्यावर अखेर दुसरी नोटीस बजावण्यात आली असून जिल्हाधिकार्‍यांकडे सरपंचाच्या कामात अनियमितता असल्याने कारवाई करण्यास प्रस्तावित करण्यात आले आहे, असे  गटविकास अधिकार्‍यांनी लेखी उत्तर दिल्यानंतर सौदाळेवासीयांनी उपोषण मागे घेतले.

सौदाळे सरपंच मोतीराम तावडे हे  ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार करीत आहेत.  पाणीपुरवठा योजनेमध्ये  अफरातफर झाली आहे. तसेच ग्रा. पं. च्या माध्यमातून करण्यात आलेली कामेही निकृष्ट दर्जाची असून, सरपंच ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना उध्दट उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी अनेक लेखी तक्रारी देवगड गटविकास अधिकार्‍यांना दिल्या. मात्र, प्रशासन सरपंचांवर कारवाई करत नसल्याने  अखेर उपोषणास बसणे भाग पाडले, असे सौदाळे ग्रामस्थांनी सांगितले.  प्रकाश गुरव, रमाकांत बाणे, विश्‍वनाथ राणे, विजय मिठबावकर, जयवंत मिठबावकर, प्रकाश मुळम, राजेंद्र मिठबावकर, लवू पातले, छाया मिठबावकर, रसिका राणे, अजय मुळम, संगीता गुरव, नमिता गुरव, संजय गुरव, संदीप गुरव,अरुण गुरव, चंद्रकांत मुळम, एकनाथ राणे, संतोष राणे, सुधाकर राणे, महेश मोंडे, सुस्मीता कामतेकर, चंद्रकात पुजारी, कृष्णा विरकर, पर्शुराम मुळम, पंढरीनाथ गुरव आदी ग्रामस्थ या उपोषण आंदोलनात सहभागी झाले होते.