Thu, Apr 25, 2019 21:29होमपेज › Konkan › ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सेनेचा विरोधच : अरूण दुधवडकर

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सेनेचा विरोधच : अरूण दुधवडकर

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:15PM

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असून शिवसेना त्यांच्या पाठीशी राहील व या प्रकल्पाला शिवसेनेचा असलेला विरोध कायम असल्याचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले.

देवगड  शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख मिलींद साटम, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, जि.प.सदस्या सौ.वर्षा पवार, शहरप्रमुख संतोष तारी, लक्ष्मण तारी उपस्थित होते.

ग्रीन रिफायनरी प्रकल्प विषयी  शिवसेना स्थानिक जनतेच्या पाठीशी आहे. या प्रकल्पाचा मच्छिमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा अरूण दुधवडकर यांनी केला.

 देवगड व कणकवली तालुक्यातील ग्रा.पं.निवडणुकीचा आढावा घेतला आहे. शिवसेना सर्व ताकदीनिशी तालुक्यातील सातही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरली असून सेनेला चांगले वातावरण आहे.एक, दोन ठिकाणी गावपॅनलबरोबर तर उर्वरीत ग्रामपंचायतीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवित आहे.

आगामी विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार असून धनुष्यबाण हाच आमचा उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर पं.स.निहाय तालुक्यातील प्रत्येक शाखाप्रमुख व महिला शाखाप्रमुखांची बैठक घेणार असून त्यांचा समस्या जाणून घेणार व त्यानंतर संघटना बांधणीवर भर देणार आहे.
फयान वादळाच्या निकषाप्रमाणेच ओखी वादळात नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दुधवडकर यांनी सांगितले.कोकण पदवीधर मतदारसंघामध्येही शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.