Sat, Jan 19, 2019 02:05होमपेज › Konkan › प्लास्टिक पिशव्या विक्री करणार्‍या कोल्हापूरच्या विक्रेत्यास दंड

प्लास्टिक पिशव्या विक्री करणार्‍या कोल्हापूरच्या विक्रेत्यास दंड

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 09 2018 9:13PM

बुकमार्क करा
देवगड : प्रतिनिधी

देवगड- जामसंडे नगरपंचायत हद्दीमध्ये प्लास्टिक पिशव्या बंदी असतानाही 50 मायक्रॉनच्या खालील प्लॅस्टिक पिशव्या विक्रीसाठी आणलेल्या कोल्हापूर येथील व्यापार्‍यावर नगरपंचायतीमार्फत 5 हजार रूपये रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली.  काोल्हापूर-गांधीनगर येथील व्यापारी अनिल अर्जुनदास उदासी यांनी देवगड शहरामध्ये 50 मायक्रॉनच्या खाली असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्रीसाठी आणल्या होत्या.

यापूर्वी या व्यापार्‍याला सतत देवगड न.पं.च्या कर्मचार्‍यांनी नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये पिशव्या विकू नये, अशी सुचना दिली होती. मात्र, सूचनेकडे दुर्लक्ष करून मंगळवारी पिशव्या विकण्यासाठी तो आला होता. एका बेकरीत तो पिशव्या पुरविताना न.पं.कर्मचार्‍यांना आढळला. त्यांनी ही बाब उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी कळविल्यानंतर संबंधित व्यापार्‍याला पोलिस स्टेशन येथे बोलावून घेतले.

मात्र त्याने नगरपंचायतीचा 5 हजार रूपये दंड भरण्याची तयारी दाखविल्याने दंड भरून घेवून प्लस्टिक पिशव्या जप्त केल्या. शिक्षण व आरोग्य सभापती बापू जुवाटकर, नगरसेवक उमेश कणेरकर, नीरज घाडी, ज्ञानेश्‍वर खवळे व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.