Fri, Jan 18, 2019 05:34होमपेज › Konkan › ‘पूल कॅम्पस’द्वारे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

‘पूल कॅम्पस’द्वारे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देवरूख : प्रतिनिधी

राजेंद्र माने तंत्रनिकेतन, आंबव येथे भारत गीअर लिमिटेड, मुंबई या कंपनीद्वारे मेगा पूल कॅम्पस मुलाखत पार पडली. यात माने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे. तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. एन. बी. भोपळे यांनी भारत गीअर लिमिटेड, मुंबई कंपनीचे एचआर मॅनेजर सागर जगे व इतर टीमचे स्वागत केले. मुलाखतीसाठी उपस्थित जिल्ह्यातील सर्व तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांचेही स्वागत करून मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. 

कोकणातील गरजू विद्यार्थ्यांना संधी देणे हा कंपनीचा उद्देश आहे. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या द‍ृष्टीने मुबलक संधी आहेत.  विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन सागर जगे यांनी केले.
या ‘पूल कॅम्पस’मध्ये जिल्ह्यातील विविध तंत्रनिकेतनमधील 100 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. कोकणातील  विद्यार्थ्यांची गुणवत्ता व कौशल्य हे लक्षात घेऊन सहभागी सर्व विद्यार्थ्यांची कंपनीकडून निवड करण्यात आली. त्यांपैकी  राजेंद्र माने तंत्रनिकेतनच्या 58 विद्यार्थ्यांची निवड झाली. 

या यशाबद्दल संस्था अध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्षा नेहा माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, चंद्रकांत यादव,  दिलीप जाधव, प्राचार्य प्रा. एन. बी. भोपळे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा. रोशन डोंगरे व त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष मेहनत घेतली.
 

 

 

tags : devarukha,news,jobs for students through pool campus


  •