Thu, Feb 21, 2019 00:56होमपेज › Konkan › वाशीतर्फ देवरूखमध्ये शिमगोत्सवात जमावबंदी

वाशीतर्फ देवरूखमध्ये शिमगोत्सवात जमावबंदी

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 10:18PMदेवरूख : वार्ताहर

ग्रामदेवतेच्या मानपानावरून वाद उफाळून आल्याने व दोन्ही गट आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने  वाशीतर्फ देवरूख गावाच्या शिमगोत्सवावर 144 कलम लावण्यात आले आहे. जमावबंदीचे हे आदेश 18 मार्चपर्यंत  लागू राहणार आहेत. या आदेशाचा भंग केल्यास 188 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देवरूख पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी दिली.