Thu, Jul 09, 2020 09:42होमपेज › Konkan › देवरूख आगारातून जादा बसेस

देवरूख आगारातून जादा बसेस

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:10AM

बुकमार्क करा

देवरुख, प्रतिनिधी :

येत्या मकर संक्रांतीपासून सुरु होणार्‍या यंदाच्या मार्लेश्‍वराच्या यात्रौत्सवाच्या काळात देवरूख आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम असे : दि. 11 रोजी आंगवली मठात मार्लेश्‍वर देवाचा मांडव घालणे, 12 रोजी मठात देवाला हळद लावणे व घाणा भरणे, दि. 13 रोजी सायंकाळी मठात यात्रा व रात्री 12 वा.  मार्लेश्‍वर पालखीचे विवाह सोहळ्यासाठी शिखराकडे प्रयाण, दि. 14 रोजी मार्लेश्‍वर व साखरप्याच्या गिरिजादेवीचा विवाह सोहळा, दि. 15 रोजी सकाळी शिखरावरून मार्लेश्‍वर, गिरिजादेवी व वाडेश्‍वर या तिन्ही पालख्यांचा परतीचा प्रवास, मारळ येथे वार्षिक यात्रा, दि. 16 रोजी आंगवली गावात मार्लेश्‍वर पालखीचे घरोघरी दर्शन तर दि. 17 रोजी आंगवली मठात घरभरणीने यात्रौसवाची सांगता होणार आहे.

यात्रौत्सव काळात देवरूख आगारातून जादा बसेस सोडून भाविकांची अतिशय उत्तम प्रकारे सोय केली जाते. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. यात्रौत्सव काळातील मार्लेश्‍वराचा विवाह सोहळा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा असा असतो. त्यामुळे साक्षात देवाचा लग्नसोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने भाविक मार्लेश्‍वर शिखरावर दाखल होत असतात. त्यामुळे मार्लेश्‍वराच्या या वर्षीच्या वार्षिक यात्रौत्सवाचे भाविकांना आतापासूनच वेध लागले  आहेत.